लेण्याद्रीचे श्री गणेश मंदिर हे शासनाच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येत असल्याने येथे शासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची नवीन सुधारणा करता येत नाही. हे मंदिर प्राचीन काळापासून जसे आहे तसेच जतन करून ठेवण्यात आले आहे. गिरीजात्मज गणेशाचे मंदिर एका मोठ्या लेणीमध्ये असल्याने हे मंदिर शासनाच्या पुराण वस्तु संशोधन खात्याच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांकडून प्रत्येकी रूपये ५/- शुल्क पुरातत्व खात्याकडून आकारले जाते. या दर्शन शुल्काचे देवस्थान ट्रस्टचा काहीही संबंध नाही. परंतू मंदिरातील पूजाअर्चा करण्याचा अधिकार देवस्थान ट्रस्टला आहे. मात्र या ठिकाणी पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय नवीन काही बदल करता येत नाहीत. 
भाविकांसाठी सुविधा -

आवश्यकतेनुसार पाण्याची उलब्धता झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टने येणार्‍या भाविकांच्या निवासासाठी जमा होणार्‍या देणगी, दानपेटी, अभिषेक अथवा गुप्तदान या माध्यमातून येणार्‍या निधीचा उपयोग करून प्रथम पायथ्याशी सुंदर असे यात्रीनिवास बांधले. या ठिकाणी १० व्यक्तींची क्षमता असलेल्या १० खोल्या तसेच ५० व्यक्तींची क्षमता असलेले प्रशस्त असे २ हॉल बांधण्यात आलेले आहे. या ठिकाणी एकुण ४०० ते ५०० लोक राहू शकतील अशी व्यवस्था ६० स्वच्छता गृहासह उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 
भाविकांच्या सोयीसाठी असलेले हे भव्य प्रसाधनगृह व स्वच्छतागृह बांधलेले आहे. वैशिष्ट्य म्हणजे इतक्या लांबून पाणी आणूनदेखील स्वच्छता व व्यवस्था वाखाणण्याजोगी आहे. यामुळे श्री अष्टविनायक सुविधा प्रकल्प मुंबई यांच्याकडुन स्वच्छतेचा व सुंदर परिसर पुरस्कार देवस्थान ट्रस्टला दोनवेळा मिळालेला आहे.

राबविण्यात आलेले प्रकल्प-
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट मध्ये येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत रोषणाई साठी पवनउर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून २१ लाख रूपयांची मदत देवस्थान ट्रस्टला मिळाली होती. त्यातूनच देवस्थान ट्रस्टने ८ किलोवॅट एवढ्या मोठ्या क्षमतेचा पवनउर्जा प्रकल्प राबविला आहे. त्यातून यात्री निवास भाग क्र. २ मध्ये विद्युत पुरवठा केला जातो. तसेच या व्यतिरिक्तही विजेची टंचाई भासू नये म्हणून देवस्थान ट्रस्टने स्वतंत्र २ जनरेटर खरेदी केले आहेत.

यात्री निवास भाग - १ मध्ये २० किलोवॅट व यात्री निवास २ च्या क्षमतेनुसार , आवश्यकतेनुसार ३५ केव्ही क्षमतेचे जनरेटर उपलब्ध करून भाविकांची सोय करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. 
श्री लेण्याद्री गणपती येथे यात्री निवास भाग १ साठी २० किलोवॅट व यात्री निवास भाग - २ साठी ३५ किलोवॅट क्षमतेचे दोन जनरेटर उपल्ब्ध आहेत. यामुळे विद्यत टंचाई भासत नाही .

श्री लेण्याद्री गणपती देवस्थानने नदीजवळील जागेत विहीर घेऊन, ते पाणी ४ कि.मी अंतरावर लिफ्ट करण्यात आलेले आहे. ते पाणी टाकीमध्ये साठवून गरजेनुसार पुढे वापरण्यात येते. 

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट च्या अल्पदरातील भोजन व्यवस्थेव्यतिरिक्त भाविकांना चहा, नास्ता जेवण या सर्व सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट ने सुसज्ज असे दोन हॉटेल बांधलेले आहेत. येथे येणार्‍या भाविकांना विनम्र सेवा दिली जाते. 
गणपती देवस्थान ट्रस्ट ने भाविकांच्या निवासासाठी केलेल्या सुविधांमध्ये यात्री निवास भाग १ व भाग २ असे दोन विभाग केले आहे. पैकी यात्री निवास १ मध्ये प्रशस्त असे दोन हॉल आहेत. येथे वैदिक पद्धतीने विवाह केले जातात. 

तसेच या हॉल पैकी एका हॉल मध्ये अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. येथे प्रत्येकी रू. २० याप्रमाणे कुपन द्वारे पोटभर जेवण उपलब्ध करून दिले जाते. सकाळी ११ ते १ व सायंकाळी ८ ते १० या वेळेत भाविकांना भोजन उपलब्ध करून दिले जाते. 
यात्री निवास भाग १ चे कॉमन रूम साठी आणि भाग २ साठी पुरेशे असे एकुण ६ लाख लि. क्षमता असलेले सोलर वॉटर हिटर बसविण्यात आलेली आहे. 

लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट चे सर्व व्यवहार देवस्थान कार्यालयातून केले जातात. जसे अभिषेक, देणगी, भेटवस्तू आणि इतर मध्ये विवाह, वैयक्ति विवाह, सामुहीक विवाहांचे नियोजन करणे इत्यादी कामे चालतात. देवस्थान ट्रस्ट चे काम किंवा मार्गदर्शन हे देवस्थानचे सर्व ट्रस्टी मिळून विचारपूर्वक प्रगतीच्या दृष्टीने निर्णय घेतात व त्यांची अंमलबजावणी करतात. 
लेण्याद्री ट्रस्टच्या वतीने सुंदर असे उद्यान बनविण्यात आलेले आहे. या उद्यानास सुंदर उद्यान असे संबोधले जाते. सदर उद्यान बांधण्यात मुंबईचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. शामजी धनजी पटेल यांचा मोलाचा वाटा आहे. सदर उद्यानाशेजारी भाविकांसाठी संरक्षित वाहनतळाची सोयही केलेली आहे. 
देवस्थान ट्रस्ट चे यात्री निवास भाग १ येथील प्रशस्त असे वाहनतळ.

भाविकांची गर्दी लक्षात घेता उपलब्ध असणारे यात्रीनिवास अपुरे पडू लागल्याने पुरातत्व खात्याच्या नियमानुसार देवस्थानपासून ३०० मीटर दूर तीन एकर जागा खरेदी करून भव्य असे यात्रीनिवास भाग नं. २ ही इमारत उभी केली आहे. यामध्ये एकुण ६८ खोल्या आहेत त्यातील ३४ खोल्यांना कॉमन व ३४ खोल्यांना स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. तसेच ५ खोल्या या वातानुकुलित आहेत. यात्रीनिवास भाग २ मध्ये सामुहिक विवाहाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सामुहिक विवाह होतात. अत्यल्प अशी रक्कम रू. १५,०००/- (वधु-वर दोघांना मिळून) भरून येथे विवाहात सहभागी होता येते.
यात्रीनिवास भाग २ चा सामुहिक विवाहासाठी उपयोगात आणता येणारा हॉल व सभोवताली कॉमन रूम तसेच पहिल्या मजल्यावरील ऍटॅच व वातानुकुलित खोल्या.

यात्रीनिवास भाग २ मध्ये असणार्‍या वातानुकुलित स्वतंत्र खोल्यामध्ये सकाळी गरम पाणी, बेड अशा सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच यात्रीनिवास भाग २ च्या दुसर्‍या मजल्यावर भव्य असे दक्षिण-उत्तर हॉलचे बांधकाम पुर्णत्वास आले आहे. हा हॉल वातानुकुलित करण्याचा देवस्थान चा मानस आहे. 

यात्री निवास भाग २ ही इमारत अनेक प्रकारच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध होऊ शकेल अशा प्रकारची बांधलेली आहे. तालुक्यातील व आजुबाजुच्या परिसरातील विविध प्रकारची चर्चासत्रे, कृषीविषयक मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, योगाविषयक कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन केले जाते. या सर्व कार्यक्रमांसाठी देवस्थान ट्रस्टतर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कमीत कमी रक्कम घेऊन उपलब्ध करून दिली जाते. हे उत्पन्न ट्रस्टमार्फंतच्या विकास कामांसाठी वापरले जाते. यात्री निवास भाग २ साठी स्वतंत्र वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
.

 

2012 Shree Lenyadri Ganapati Devasthan Trust | All rights reserved